Share

‘चंद्रकांतदादांचा सल्ला काय ऐकायचा ? या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं’

Published On: 

पुणे : पुणे शहरातल्या अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती सुधारवयाची असेल, तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसले पाहिजे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलला पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

चंद्रकांत पाटलांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ‘मी काय काम करतो ते सर्वांना माहित आहे. माझ्या नेत्याने, महाविकास आघाडीने सांगितलं तर मी ऐकेन. चंद्रकांतदादांचा सल्ला काय ऐकायचा ? या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं. समोरचा अभ्यासपूर्ण आणि कोणत्या भावनेनं सल्ला देतोय हे महत्वाचं आहे.’ असा टोला अजित पवार यांनी पुण्यातील जिल्हा आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांवर टीका –

‘देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकते. पण मी चॅलेंज केले होते की, अजित पवारांना फोन लावून द्या, कारण ते गायबच होते. २४ तास ते कोणालाच उपलब्ध झाले नव्हते. अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही. पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असा वाटतं की, त्यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा. आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. पण एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातून कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता दिलासा हवा आहे.’ असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!