Share

चिंताजनक! नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी १६ बळी; १०७३ रुग्ण

Published On: 

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला आहे. संचारबंदी करून सुद्धा रुग्णांच्या संख्येत कमतरता येताना दिसत नसून,संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात शनिवारी,२७ मार्च रोजी प्राप्त झालेल्या ४ हजार २५७ अहवालापैकी ३ हजार ६१ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून १०७३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात उपचार घेत असलेल्या १६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. ६३८ जणांचा उपचाराअंती घरी पाठविण्यात आले.

शनिवारी,२७ मार्च रोजी सिडको भागातील ५५ वर्षीय महिला, तरोडा बु. येथील ४० वर्षीय पुरूष, विष्णुपुरीमधील ६७ वर्षीय पुरूष, आनंदनगर येथील ४२ वर्षीय महिला, पिरबुऱ्हाननगर येथील ६५ वर्षीय पुरूष, गुलजारबाग येथील २८ वर्षीय तरूण, वजिराबाद येथील ७२ वर्षीय महिला, आनंदनगर येथील ६५ वर्षीय महिला, गणेश टॉकीज परिसरातील ६५ वर्षीय पुरूष, माणिकनगरमधील ५० वर्षीय पुरूष, नांदेड मधील ८० वर्षीय महिला, लोह्यातील ६० वर्षीय पुरूष, मुदखेडमधील ६५ वर्षीय पुरूष, कंधार तालुक्यातील दाताळा येथील ५२ वर्षीय पुरूष, हिमायतनगर तालुक्यातील पारंबा येथील ७१ वर्षीय पुरूष, भोकरच्या गांधी चौकातील ६५ वर्षीय पुरूष, उपचार चालू असताना विष्णुपुरी, वजिराबाद येथील शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात मरण पावले.

ल्ह्यात गेल्या २४ तासात १०७३ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामध्ये नांदेड मधील ५५४, नांदेड ग्रामीणमधील ४४, लोहा तालुक्यातील येथील २५, हिमायतनगर-५, कंधार- ४७, उमरी- २ं९, धर्माबाद- १३, देगलूर- ३३, किनवट-३९, मुखेड-९३, नायगाव-३४, बिदर- १, हदगाव-१८, मुदखेड- १४, भोकर ६, बिलोली ३५, अर्धापूर ३१, परभणी ९, माहूर ११ एवढ्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ६३८ जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. शनिवारपर्यंत २ लाख ९७ हजार ४८० जणांचे स्वॅब तपासण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!