Share

‘वाईट गोष्टी म्हणजे अकर्मण्यता, खंडणी, टक्केवारी, सूडबुद्धी वगैरे का’?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाच्या धोक्याची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धूलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया. निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सणांच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेण्याचे सांगताच भाजपचे आमदार आणि नेते अतुल भातखळकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. ‘वाईट गोष्टी म्हणजे अकर्मण्यता, खंडणी, टक्केवारी, सूडबुद्धी वगैरे का’? अस ट्विट करत भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!