मुंबई : गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले? हाच तपासाचा विषय. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले, असे रोखठोक मत शिवसेनेनं मांडले. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. अशी टीका संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून गेली आहे.
यावर आता भाजपाचे महाराष्ट्र आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. अनिल देशमुख हे ‘अपघाताने’ गृहमंत्री, अगदी बरोबर, पण पूर्ण सत्य लिहा ना अनिल देशमुख हे ‘अपघाताने’ गृहमंत्री तर उद्धव ठाकरे हे ‘विश्वासघाताने’ मुख्यमंत्री ! बुरा ना मानो होली है ! असा खोचक टोला त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून लगावला आहे.
अनिल देशमुख हे "अपघाताने" गृहमंत्री : संजय राऊत
अगदी बरोबर, पण पूर्ण सत्य लिहा ना
अनिल देशमुख हे "अपघाताने" गृहमंत्री तर
उद्धव ठाकरे हे "विश्वासघाताने" मुख्यमंत्री !बुरा ना मानो होली है ! pic.twitter.com/HlVSkzJnD4
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) March 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- म्यानमारमध्ये लष्कराडून आंदोलने चिरडण्यासाठी नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार
- अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, सामनातून मोठा गौप्यस्फोट
- होळी, धूलिंवदन या सणांतून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया – मुख्यमंत्री
- युवराज सिंगला दिलासा ‘त्या’ प्रकरणात होणार नाही कोणतीही कारवाई
- अबब! तब्बल सहा वर्षांपासून पाणीपट्टी न भरता धरणातून पाणी उपसा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

