जालना : पोलिसांकडून होणाऱ्या जलद कारवाईच्या घटना तशा क्वचित घडतात. अशीच एक घटना जालना येथे घडली गोदाम फोडणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी तब्बल ५ तासात मुसक्या आवळल्याने सर्वत्र जालना पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे गोदाम मालकालाही पोलिसांनीच चोरीची आणि चोर पकडल्याची माहिती सुद्धा दिली. त्यामुळे गोडाऊन मालकाने जलद कारवाईचे स्वागत केले.
चोरट्यांनी २६ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास शेती अवजाराचे दुकान फोडले. यानंतर शेती साहित्य मिनीडोअरमध्ये टाकून ते विकण्यासाठी एकजणाकडे आरोपी गेल्याची माहिती एलसीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चोरट्यांमधील खबऱ्याकडून मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिनीडोअर, मुद्देमालासह विक्री करताना आरोपींना सकाळी १० वाजेच्या सुमारास आरोपींना जेरबंद केले.
खादा गुन्हा घडल्यानंतर त्यातील आरोपी मिळणे, नंतर त्या आरोपींकडून मुद्देमाल रिकव्हर करणे या तपासात बराच वेळ जातो. अनेकदा आरोपींकडून मुद्देमालही जप्त होत नाही. यामुळे घरफोडी, दुकान फुटण्यातून गेलेला मुद्देमाल मिळेपर्यंत अनेक समस्यांचा सामना फिर्यादींना करावा लागतो. दरम्यान, जालना शहरातील रत्नदिप टॉकीजच्या पाठीमागील बाजूस असलेले मुंदडा यांचे शेती अवजारे व प्लंबींगचे लोखंडी सामान असलेले बंद गोडावूनचे शटर उचकाटून चोरट्यांनी शेती अवजारे, लॅबींगचे लोखंडी सामान चोरुन नेल्याची ही घटना २६ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली होती.
महत्वाच्या बातम्या
- अबब! तब्बल सहा वर्षांपासून पाणीपट्टी न भरता धरणातून पाणी उपसा
- केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा दिले शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचे संकेत
- आयपीएलमध्ये स्टोक्स पासून सावध रहा !, जॉस बटलरचा इशारा
- बीड जिल्ह्यात कोविड सेंटर हाऊसफुल्ल!
- एका लग्नाची अजब गोष्ट ; नवरीमुलीनेचं घातलं नवऱ्यामुलाला मंगळसूत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

