Share

म्यानमारमध्ये लष्कराडून नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार; अमेरिकेकडून निषेध !

Published On: 

म्यानमार: गेल्या माहिनाभारापूर्वी 1 फेब्रुवारीला म्यानमार या देशात लष्कराने राष्ट्राध्यक्ष आंग सान स्यू की यांचे सरकार उलथवून टाकत लष्करी राजवट लागू केली आहे. मात्र तेथील जनता या राजवटीचा विरोध करत असून माहिनाभारापासून आंदोलने सुरु असून लष्कराडून आंदोलने रोखण्यासाठी हिसंक मार्ग अवलंबत आहे.

यामध्ये शनिवारी म्यानमारमध्ये लष्कर दिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी बर्मा येथे आयोजित एका लष्करी कार्यक्रमाच्या स्थळी आंदोलन कर्त्यांनी मोठा मोर्चा काढला व देशातील लष्करी राजवटीला विरोध दर्शवला. आतापर्यंत आंदोलनकर्ते व लष्करामध्ये झालेल्या हिंसाचारात 400 हून अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

लष्कराच्या या अत्याचारी कृत्याचा अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांकडून निषेध करण्यात आला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांनी म्यानमारमध्ये शनिवारी झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी ट्वीट करून म्हटलं, ‘म्यानमारमध्ये लष्करानं केलेला हिंसाचार पाहून आम्ही स्तब्ध झालो आहोत. लष्कर काही ठराविक लोकांची सेवा करण्यासाठी सामान्य नागरिकांचा बळी देत आहे, असं वाटतंय. हिंसाचारात बळी पडलेल्यांप्रति आम्ही संवेदना व्यक्त करत आहोत. म्यानमारमधील धाडसी जनतेनं लष्कराच्या दडपशाहीला नकार दिला आहे.’

ब्रिटनचे राजदूत डेन चग यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं की, लष्करानं निःशस्त्र नागरिकांवर गोळीबार करून आपली प्रतिष्ठा गमावली आहे. लष्कराकडून निःशस्त्र सामान्य नागरिकांची हत्या केली जात आहे, असं अमेरिकन दूतावासानंही म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!