पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा फिरकीपटू गोलंदाज कुलदिप यादव सपशेल अपयशी ठरला आहे. दोन्ही सामन्यात कुलदीप एकही गडी बाद करु शकला नव्हता. त्यामुळे मालिकेतील अंतिम सामन्यात कुलदीप संघाबाहेर जाणे जवळपास निश्चीत झाले आहे. मात्र एक वेळ आघाडीचा गोलंदाज म्हणुन ओळखला जाणारा कुलदीप यादव एकदम इतका मागे का पडला.
यामागे एक मोठे कारण समोर येत आहे. ते कारण म्हणजे भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी. धोनीने नेतृत्व केलेल्या ४७ सामन्यात खेळताना कुलदीपने ९१ गडी बाद केले तर धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर १६ सामन्यात केवळ १४ गडी बाद केले आहे. ही आकडेवारी फारच धक्कादायक आहे. हेच आकडे चहलच्या बाबतीत दिसत आहेत. धोनी संघात असताना चहलने ४६ सामन्यात ८२ गडी बाद केले होते. तर धोनीच्या निव़ृत्ती नंतर ८ सामन्यात फक्त ११ गडी बाद केले आहे.
धोनी जेव्हा संघाकडून खेळायचा तेव्हा या दोन्ही गोलंदाजाना यष्टीमागून चेंडु कसा टाकायचा याबाबत नेहमी सल्ला द्यायचा. आणि तो सल्ला ऐकल्यानंतर अनेकदा दोघांना बळी मिळवताही आलेले आहे. यासंदर्भात अनेक व्हिडीओही सोशल मीडीयावर व्हायरल झालेले आहे. याचा अर्थ असा की, यष्टीमागून जे काम धोनी करायचा फिरकीपटूसाठी ते काम भारताचे आताचे यष्टीरक्षक रिषभ पंत किंवा के.एल. राहुल करत नसावे. कुलदीपच्या खराब कामगीरीमुळे आखेरच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळु शकते.
महत्वाच्या बातम्या
- अबब! तब्बल सहा वर्षांपासून पाणीपट्टी न भरता धरणातून पाणी उपसा
- केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा दिले शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचे संकेत
- आयपीएलमध्ये स्टोक्स पासून सावध रहा !, जॉस बटलरचा इशारा
- बीड जिल्ह्यात कोविड सेंटर हाऊसफुल्ल!
- एका लग्नाची अजब गोष्ट ; नवरीमुलीनेचं घातलं नवऱ्यामुलाला मंगळसूत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

