लातूर : राज्यात कोरोना कहर वाढत असल्यामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनचे वारे वाहत आहेत. तर काही शहरात लॉकडाऊन लागून गेले आहे. त्यातच लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेला उधाण आल्यामुळे की काय चक्क २ लाख दारूच्या बाटल्यांची चोरी झाली आहे.यामुळे संपूर्ण जिल्हाभरात या चोरीची सुद्धा चर्चा रंगली आहे.
साकोळ येथील हॉटेल गुरुदिप बारमधून अज्ञात चोरट्यांनी चक्क २ लाख ५३ हजार ६४० रुपयांची दारू पळविली आहे. या घटनेनंतर हॉटेल मालकाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण या घटनेने पुन्हा एकदा पोलीस विभागावर ताशेरे ओढण्याचे काम केले आहे. जेव्हा संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असताना, पोलीस रात्रीच्या वेळी रस्त्यावर असताना सुद्धा अशा प्रकारची घटना घडणे हा चिंतेचा विषय ठरू शकतो.
या घटनेमुळे येणाऱ्या काळात पोलीस विभागाला आणखीन चपळता दाखवण्याची गरज आहे. लॉकडाउनच्या चर्चेमुळे येणाऱ्या काळात आणखी चोऱ्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नागरिकांनीसुद्धा येत्या काळात सतर्कता बाळगायला हवी.
महत्वाच्या बातम्या
- अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड
- नितळ त्वचेसाठी घ्या ‘या’ रसांचा आस्वाद
- धक्कादायक! उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याने शिवसैनिकांनी दैनिकाचे कार्यालय फोडले
- पाय धुण्यासाठी कार्तिक कालव्यात उतरला, दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळला!
- ‘लॉकडाऊन झाल्यास त्यातून उद्योग क्षेत्राला वगळावे’, ‘मसिआ’ची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

