Share

‘लॉकडाऊन झाल्यास त्यातून उद्योग क्षेत्राला वगळावे’, ‘मसिआ’ची मागणी

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे नागरिकांसह उद्योग जगतामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे (मसिआ) सचिव राहुल मोगले यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल मोगले म्हणाले की, लॉकडाऊनच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून आम्ही ऐकल्या आहेत. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर आता कोठे उद्योगविश्व हळूहळू रुळावर येत आहे. कोरोनाची परिस्थिती कायम असल्याने उद्योगांमध्ये कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन करायचे जरी ठरवले तरी उद्योगक्षेत्राला यातून वगळावे अशी विनंती करणार असल्याचे ‘मसिआ’चे सचिव मोगले यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’ आणि ‘मासिआ’ या उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांची भेट घेतली. संघटनेच्या वतीने सर्व उद्योगांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजना करण्याचा विश्वास दिला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते. याचा फटका उद्योगांसह सर्वच क्षेत्रांना बसला. त्यामुळे पुन्हा त्या परिस्थितीला सामोरे जावे तर लागणार नाही ना, अशी भीती उद्योजकांना आहे.

लॉकडाऊनबाबात पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता म्हणाले, सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाहीये. संबधित अधिकाऱ्यांसोबत बैठक होऊन निर्णय घेतला जाईल. निर्णय घेतला की नागरिकांना कळवला जाईल. सोशल मीडियावर सध्या जे सुरू आहे, त्या केवळ अफवा आहेत. परंतू एक ते दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय म्हणाले की, सोमवारपासून लॉकडाऊन लागू होणार नाहीये. पण कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि संबधित यंत्रणा निर्णय घेतील. पण सोमवारपासून लॉकडाऊन लागणार नाही हे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!