Share

अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड

Published On: 

नवी दिल्ली: जगभरात सध्या प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळं आणि टंचाईमुळं इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. अनेक कंपन्या यावर काम करत असून विना ड्रायव्हरच्या गाड्या देखील लवकरच पाहायला मिळणार आहे.

यामध्ये काही दिवसांपूर्वीच अमेझॉननी वाहन उद्योग क्षेत्रामध्ये प्रवेश करत एक अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार सदर केली होती त्यानंतर आता होंडाने जपान मध्ये जगातील सर्वात आधुनिक सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड नावाने सादर केली आहे. जपान मध्ये सुरवातीला लिजंडची फक्त १०० युनिट रस्त्यावर आणली गेली असून या कारला लेव्हल ३ ऑटोनॉम्स ड्रायव्हिंग तंत्रज्ञान दिले गेले आहे. गल्ली बोळातून जाताना किंवा लेन बदल करताना अॅडप्टीव्ह ड्रायव्हिंग मॅनेज करण्याची या कारची क्षमता आहे.

देशातील ग्राहकला ऑटोनॉमस वाहनाचा अनुभव कसा येतो आणि ही वाहने प्रत्यक्ष वापरात किती व्यवहार्य ठरतात याचेही अध्ययन होंडा कडून केले जात आहे. ऑटोनॉमस वाहनात आत बसणाऱ्या व्यक्तीला नेहमीच सावध राहावे लागते हे लक्षात घेऊन होंडा लिजंडला आपत्कालीन स्टॉप फंक्शन दिले गेले आहे. ड्रायव्हरने हँडओव्हर आदेशाला प्रत्युत्तर दिले नाही तर हे फंक्शन कार्यरत होते. कार मधील मुख्य कॅमेरा युनिट सतत वाहतूक स्थिती ट्रेक करते.

या कार सुरुवातीला लीजवर दिल्या जाणार असून कारची किंमत ११ मिलियन येन म्हणजे ७४ लाख रुपये आहे. लेव्हल तीन ऑटोनॉमस सध्या जगातील सर्वाधिक अॅडव्हान्स्ड टेक्निक आहे. सेल्फ ड्राईव्ह वाहनात ऑटोनॉमस साठी ० ते ५ रेटिंग दिले जाते. ५ लेव्हल फुल ऑटोनॉमस असून भविष्यात लेव्हल ५ मध्ये ड्रायव्हर साठी स्टिअरिंग किंवा कंट्रोल नसतील असे सांगितले जाते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!