Share

धक्कादायक! उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याने शिवसैनिकांनी दैनिकाचे कार्यालय फोडले

Published On: 

बीड : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लिखाण केल्याने बीड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एका वृत्तपत्र कार्यालयावर दगडफेक केल्याचा प्रकार घडलाय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे व इतर १० जणांनी दैनिक लोकाशा कार्यालयावर हल्ला करत दगडफेक केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात विधिमंडळात विधान केले होते. यावर दैनिक लोकाशा या बीडच्या दैनिकात लेख लिहिण्यात आला. त्यात ‘अधिवेशनात बाबर यासोबतच रामाच्या रॉयल्टीसाठी ठाकरेंचा रिक्षा कबरीत’, असा उल्लेख करण्यात आला होता. यावर आक्षेप घेत आज सुशील पिंगळे यांनी लोकाशा कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड केली.

तसेच घटनेचा व्हिडिओ शुट करत सोशल मीडियावर व्हायरल केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी सदर वृत्तपत्राच्या संपादकाला जीवे मारण्याची धमकी देत गाडी जाळण्याचा इशाराही देण्यात आला. याबाबत बीड शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयावर केलेल्या या दगडफेकीत नुकसान झाल्याचे समजतेय.

दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात सत्ताधारी असणाऱ्या पक्षाचे कार्यकर्तेच कायदा हातात घेत असतील तर नागरिकांच्या सुरक्षिततेचं काय, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. संबंधित आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!