बीड : बीड जिल्ह्यात एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. उजव्या कालव्यातील रॅमवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे घडली. कार्तिक अक्रुर चव्हाण असे बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, कार्तिक याचे वडील अक्रुर चव्हाण हे पुणे शहरात कंपनीत कामाला आहेत. त्यामुळे आई-वडिल पुण्याला असल्याने कार्तिक हा आजीकडे राहत होता. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास काही मुलांसोबत तो उजव्या कालव्याजवळ गेला होता. कालव्यात पाणी असल्याने तो हात पाय धुण्यासाठी रॅमवरुन पाण्यात उतरला मात्र, अचानक त्याचा पाय घसरून पाण्यात वाहू लागला. कार्तिक पाटाच्या पाण्यात वाहून गेला याची माहिती सोबत असलेल्या मुलांनी त्याच्या आजीला घरी जाऊन दिली.
यानंतर ग्रामस्थांनी त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. रात्र झाल्याने आज शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी पुन्हा शोध सुरू केला असताना घटना झालेल्या काही अंतरावर कार्तिकचा मृतदेह सापडला. त्याच्यावर जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊन झाल्यास त्यातून उद्योग क्षेत्राला वगळावे’, ‘मसिआ’ची मागणी
- औरंगाबाद शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन? जाणून घ्या काय सत्य आहे
- औरंगाबाद लॉकडाऊनबद्दल मनपा आयुक्तांची महत्त्वाची माहिती, म्हणाले..
- पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रिय; पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न
- भाजपनंतर ‘महाविकास’कडूनही धनगर समाजाची अवहेलना, धनंजय मुंडेंची खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

