Share

जागतिक पर्यावरण दिन! जिल्हाधिकाऱ्यांनी लावले सपत्नीक वडाचे झाड

Published On: 

औरंगाबाद : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोगा बाबा टेकडी हरीतकरण योजनेचा शुभारंभ, विद्यापीठ परिसरातील गोगो बाबा टेकडी जवळ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वृक्षा रोपण करून झाला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्नी कंचन चव्हाण यांच्यासह परिसरात वडाचे झाड लावले. यावेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, कर्नल व्यंकटेश पी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माझी वसुंधरा उपक्रम राज्यात सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून गोगा बाबा टेकडी जवळ आज वृक्षा रोपण करण्यात आले. सध्या सुरु असलेली कोरोना महामारी पाहता नैर्सगिक ऑक्सिजन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तर वाहनांचा कमी वापर देखील पर्यावरण पोषक असून कमी अंतरावर वाहनांचा वापर टाळण्याचे आवाहन पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी केले.

यावेळी अनेक पर्यावरण प्रेमींनी गोगा बाबा टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षा रोपण केले. तसेच या योजनेत भारतीय सैन्याने सहभागी होत वृक्षा रोपण करण्याच्या पद्धतीचा तंबू लावत पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन केले. येत्या काळात या परिसरात दहा हजारांपेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!