मुंबई : बॉलिवूड ची सुप्रसिध्द अभिनेत्री यामी गौतम विवाहबंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अचानकपणे तिने सगळ्यांना विवाहाची बातमी देत सुखद धक्का दिला आहे. दिग्दर्शक आदित्य धार सोबत यामीने लग्नगाठ बांधली आहे.
आदित्य हा बॉलिवूडचा नावाजलेला दिग्दर्शक आहे. ‘उरी : द सर्जीकल स्ट्राइक’ दिग्दर्शित केला होता. यामी आणि आदित्यने अगदी साध्या पद्धतीने व जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह केला. या चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते.
https://www.instagram.com/p/CPsp4oGFnE5/?utm_source=ig_web_copy_link
यामीने एक फोटो शेअर केला आहे. यात तिने लाल रंगाची साडी नेसली असून ती अतिशय सुंदर दिसत आहे, आणि त्यावर क्लासिक लाल रंगाचा दुपट्टा तिने घेतला होता. याशिवाय आदित्यने बेबी पिंक शेरवानी परिधान केली होती. ते दोघेही या पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहे. ‘कुटुंबीयांच्या आशिर्वादाने आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पाडला आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. या पोस्टवर तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दैव बलवत्तर : मोठ्या झुंबरासह पीओपी स्लॅब कोसळला अन् आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’


