मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान इंग्लंड मध्ये साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड दरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. मागील दोन वर्षापासुन सुरु असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येउन पोहोचली आहे. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज या मालिकेच्या बाबतीत वेगवेगळे भाकित व्यक्त करत आहे.
यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने या सामन्याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की जो संघ चांगली गोलंदजी करेल तोच संघ अंतिम सामन्यात विजयी होईल. भारत आणि न्युझीलंड संघात जे गोलंदाज आहेत ते बरोबरीचे आहेत. मात्र एक गोष्ट न्युझीलंडच्या पथ्यावर पडते. ती म्हणजे इंग्लंडमधील खेळपट्टी ही त्याच्या घरच्या खेळपट्टीप्रमाणे आहे. त्यामुळे न्युझीलंडचा संघ हा भारतीय संघाच्या एक पाउल पुढे असणार आहे. यामुळे न्युझीलंडच्या गोलंदाजाना या खेळपट्टीवर स्विंग आणि सिम चा वापर करुन कशी गोलंदाजी करायची याचा अनुभव आहे. मात्र याचवेळी भारतीय संघाकडे अशा गोलंदाजीला खेळण्यासाठी सक्षम फलंदाज आहेत. असे ब्रेट ली यावेळी म्हणाला
जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहे. न्युझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स येथे सुरु आहे. यादरम्यान इंग्लंडमध्ये दाखल झालेला भारतीय संघ सध्या विलगीकरणात आहे. आगामी काळात भारतीय संघ आपाआपसात सराव सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पैशांच्या देवाण-घेवाणीतून साडूनेच काढला जमीर खान शब्बीर खान ऊर्फ जम्याचा काटा!
- दैव बलवत्तर : मोठ्या झुंबरासह पीओपी स्लॅब कोसळला अन् आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

