कोल्हापूर : भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवकालीन ‘होन’ फोटो शेअर केले आहे. दोन दिवसांपूर्वी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधला होता. शिवराज्याभिषेक दिनासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन संभाजीराजेंनी यावेळी केलं आहे.
संभाजी छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘होन’च्या साक्षीने साजरा होणार. स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा ‘होन’ हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार.
स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा 'होन' हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक 'होन'च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 5, 2021
या वर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही शिवराज्याभिषेक दिनावेळी राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोना संकट काळात पार पडणारा हा दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा असेल. दरम्यान, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’


