Share

पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान

Published On: 

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्यात जोरदार शीतयुध्द सुरू आहे. हा कलह दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्त्वासमोर आहे. त्यामुळेच तीन सदस्यीय समिती नेमून त्याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे. पंजाबमधील बंडखोरी रोखण्यासाठी त्रिसूत्री फॉर्म्युला तयार करण्यात येत आहे. त्यानुसार दोन उपमुख्यमंत्री आणि नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार आहे.

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार तीन सदस्यीय समितीने गुरुवारपर्यंत पंजाब काँग्रेसमधील जवळपास 100 नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आज या समितीने मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर आता ही समिती आपला अंतिम अहवाल पक्षनेतृत्त्वाला पाठवणार आहे. सूत्रांच्या मते, या रिपोर्टमध्ये तीन प्रस्तावांची शिफारस केली जाऊ शकते. यानुसार कॅप्टन अमरिंदर सिंह यांची खुर्ची शाबूत राहील, मात्र त्यांच्याखाली दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते. ज्यामधील एक SC समाजातील असेल. याशिवाय नवा प्रदेशाध्यक्षही नियुक्त केला जाऊ शकतो.

दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत जाण्यापूर्वी आपचे तीन आमदार काँग्रेस पक्षात आणले आहेत. या आमदारांना पक्षात घेतल्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले. त्यांचं हे पाऊल सिद्धू यांच्यासाठी थेट इशारा असल्याची चर्चा सुरू आहे. आपचे नेते सुखपाल सिंग खैरा, जगदेव सिंग कमलू आणि पिरामल सिंग धौला यांना पक्षात प्रवेश केला. त्यांना आपमधून निलंबित करण्यात आलं होतं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर तिघांना प्रवेश देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!