🕒 1 min read
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधन व प्रशिक्षणामध्ये काळानुरूप बदल करून नावीन्यपूर्ण संशोधन करावे, संशोधनाची व्याप्ती वाढवावी, प्रशिक्षण देताना ज्याप्रमाणे अमेरिका-चीन देशांमध्ये कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षण राबवले जाते त्याच धर्तीवर जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टीमार्फत सुरू केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
बार्टीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा २०२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री मुंडे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते आणि यावर्षी सामाजिक न्याय विभागामार्फत सर्वच्या सर्व ७५ विद्यार्थ्यांच्या जागा भरलेल्या आहेत. त्यात या वर्षी पन्नास विद्यार्थ्यांची वाढ करत सव्वाशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे आणि आगामी काळात ही संख्या दोनशेपर्यंत नेणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुण्यात सैनिकी शाळा सुरू करण्याकरिता प्रयत्नशील आहोत असे नमूद केले. विद्यार्थ्यांकरिता आणखी स्वाधार योजनेत बदल करण्यात येऊन तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे पुणे येथे आणखी दोन वसतिगृहे उभारणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या
- मी दाखवतो कोण पार्ट्या करतात; नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा
- ‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात
- ‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’
- दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान; मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप
- शिवसेनेच्या वाघिणीने मैदान मारलं, मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
