Share

‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं, आता ते बिघडवलं जात आहे. आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांनी खुशाल उड्या माराव्यात, एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. यांना घरातच बाथरुममध्ये तोंड लपवून बसावे लागेल, अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, असा इशारा संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना दिला आहे.

ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणा काम करत असल्याचं दाखवत आहेत ते सर्व राजकीय षडयंत्र आहे. प्रत्येकाच्या बाबतीत हे षडयंत्र रचलं गेलं आहे. मी सुद्धा हे भोगलं आहे. आमच्या कुटुंबाने भोगलं आहे. माझ्या पत्नीला त्रास देण्यात आला. कुटुंबाला त्रास दिला गेला. ज्यांच्यामुळे भाजपचं सरकार येऊ शकलं नाही त्या प्रत्येकाला त्रास दिला जात आहे. जे लोकं भाजपाच्या अमिषाला बळी पडत नाही, सरकार पाडण्यासाठी त्यांना त्रास दिला जात आहे. तुम्ही कितीही त्रास दिला आणि अटकासटका केल्या तरी तुमचं सरकार येणार नाही, असे राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले.

यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. ‘अहो संजय राऊत, परमबीर यांच्या पलायनाचे पाप केंद्राचे कसे? तुमच्या डोळ्यासमोरून पळालेत ते? इतकी आदळआपट करताय मग त्यांना निलंबित करण्याची केंद्राला शिफारस का नाही केली? अहो पदावरून दूर ही केलं नाही त्यांना तुम्ही. काही डील झाले आहे का?’ असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. तसेच शिवसेनेने परमबीर यांच्या सोबत झालेले डील उघड करावे, त्यासाठी त्यांना अजूनही पदावर ठेवण्यात आले आहे. कोणासाठी अभय मागितले? असे ट्विटही त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!