सिल्वासा : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना तीकिट देण्यात आले. तर भाजपकडून महेश गावित तर काँग्रेसकडून महेश धोदी यांना तीकिट देण्यात आले होते. या निवडणुकीत तिरंगी लढत बघायला मिळाली. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वाघिणीने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 63,382 मते मिळाली.
भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणूकीच्या निकालामुळे भाजपला मोठी हार पत्कारावी लागली असून चांगलाच धक्क बसला आहे. शिवसेनेच्या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी ट्विट करत ‘शिवसेना ऐतिहासिक जीत के और’ असे म्हंटले आहे. तेव्हा कलाबेन डेलकर यांना ४४ हजार ७२३ मते मिळाली होती. भाजप उमेदवार महेश गामित यांना २९ हजार ३३८ मते मिळाली होती. कमलाबेन डेलकर या १५ हजार ३३५ मतांनी तेव्हा आघाडीवर होत्या.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीत सहभाग घेत अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. तसेच भाजपकडून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला, विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- फटाके फोडा पण धूर काढू नका; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस-मलिकांचा वाद शिगेला
- याला त्याला अटक करायला केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या बापाची आहे का?; संजय राऊतांचा संतप्त सवाल
- भाजप राक्षस गणाचा आणि खालच्या पातळीचा पक्ष; परमबीर सिंगवरुन मिटकरींची केंद्र सरकारवर टीका
- ‘ठाकरे सरकारच्या मदतीनेच परमबीर सिंह गायब’, आशिष शेलारांचा पलटवार


