Share

‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’

Published On: 

नागपूर : सध्या राज्यात ड्रग्ज हा विषय सर्वात जास्त चर्चेचा त्याचबरोबर राजकारणाचाही मुद्दा ठरला आहे. क्रुझ पार्टी प्रकरणावरुन हे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला क्रुझ पार्टीमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर ताब्यात घेतलं. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये या विषयावरुन तुफान खडाजंगी झाली. त्यात आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

या सर्व प्रकरणावरुन आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखा आणि इओडब्लु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.

‘ड्रग्जच्या काळ्या धंद्यात भाजपचे नेते, भाजपशी संबंधित लोक यांचे मोठे रॅकेट आहे. देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचा गोरखधंदा सुरू असून त्याच्याशी संबंध असलेल्या मनिष भानुशाली, के. पी. गोसावी, रविंद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट काम करत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट केला. तसेच यामागील मास्टर माईंड कोण आहे? हे जनतेसमोर यावं यासाठी या सर्वांना अटक करावी. त्याचबरोबर EOW आणि क्राईम ब्रँचमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टवर देशातील सर्वात मोठा ड्रग साठा ३००० किलो ज्याची किंमत २१ हजार कोटी रुपये आहे, हा पकडला गेला. देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचे एक मोठे षडयंत्र असून यात भाजपाचे नेते, भाजपाशी संबंधित लोक यांचा सहभाग आहे. मुंद्रा पोर्टवरील या कारवाईवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मुंबईत एमसीबीच्या मार्फत क्रूझवर रेड टाकून काही ग्रॅम ड्रग पकडून हे प्रकरण तापवत ठेवले गेले जेणेकरुन मुंद्रा प्रकरणाची चर्चाच होऊ नये, असंही अतुल लोंढे म्हणाले आहेत.

अदानी मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज व मुंबईतील एनसीबीची रेड यात काही समान धागेदोरे आहेत. के.पी. गोवासी, मनिष भानुशाली व एनसीबीचे समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी संबंध येत आहे. समीर वानखेडेसोबत सुनील पाटील, सुनिल पाटीलसोबत मनिष भानुशाली आणि मनिष भानुशालीसोबत के. पी. गोसावी हे एक वर्तुळ आहे. तर निरज यादव हा मध्य प्रदेशचा भाजपाचा कार्यकर्ता आहे. हे सर्वजण या रॅकेटचा हिस्सा आहेत, असा गंभीर आरोप लोंढे यांनी केला आहे..

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!