मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना या वादात ओढल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणानंतर नवाब मलिक विरुद्ध भाजप असा मोठा शाब्दिक वाद सुरु झालाय. या वादात देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
नवाब मलिक यांनी मंगळवारी सकाळी फोर सीझन हॉटेलमधील पार्ट्यांचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. या हॉटेलात 15 कोटी रुपयांच्या पार्ट्या होत होत्या, तिथे फडणवीस यांचा भाऊ असायचा, असा आरोप मलिकांनी केला होता. या आरोपांना भाजपचे आमदार नितेश राणे त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
फोर सीझनमध्ये काय चालायचे याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे होते, असे मलिक म्हणाले होते. त्यावर राणे यांनी तिथे कोण पार्ट्या करतात ते मीच दाखवतो, असे म्हणत मलिकांना आव्हान दिले आहे. फोर सिजन हॉटेलमध्ये काय चालते कोण पार्टीला असतं हे मला सांगायला लावू नका. पार्टी कशी होते, हे त्यांनी त्यांच्या पर्यावरण मंत्र्याला विचारावे, असे सांगत राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात
- ‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’
- दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान; मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप
- शिवसेनेच्या वाघिणीने मैदान मारलं, मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव
- फटाके फोडा पण धूर काढू नका; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस-मलिकांचा वाद शिगेला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

