Share

दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान; मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना केंद्रसरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्यसरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या प्रयत्नाला राज्यसरकार किंवा त्यातील एकही व्यक्ती न घाबरता लढा देणार, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.

कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले. भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते. भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोषत्व बहाल करण्यात आहे. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे, यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असंही मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!