जळगाव : कोरोनामुळे महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. कलम १४४ लागू झाल्याने संचारबंदीसह अत्यावशक सेवा वगळता बहुतांश नोकरवर्गाचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले आहे. त्यामुळे संगणक, एसी, टीव्ही, पंखे, कुलर, मोबाइल आदी उपकरणांचा वापर नेहमीपेक्षा जास्त वाढला आहे. त्यामुळे यंदा वीज बिल जास्त येण्याची शक्यता आहे.
वर्क फ्रॉम होममुळे विजेच्या उपकरणांचा वापर जास्त होत आहे. त्यातच उन्हाळा असल्याने कुलर, एसी सुरूच आहेत. त्याचा परिणाम वीज बिलावर होणार आहे. विजेचे बिल हे विजेच्या वापरानुसार येत असल्याने विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे आणि वेळेत वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे आलेल्या वीजबिलांच्या रकमा अजूनही काही वीज ग्राहकांकडे थकीत आहे. मागील वर्षीचे वीज बिल भरता भरता अनेक सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिकदृष्ट्या पार कंबरडे मोडले आहे.
पूर्वी वीज बिल माफ होईल, असे आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे महावितरणकडून वीज बिल वसुली मोहीम राबवून बिलाचा भरणा न करणाऱ्यांच्या वीज कापण्यात आल्या. दरम्यान, ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी जनजागृतीही केली जात आहे. तसेच वीज बिल न भरल्यास कनेक्शन कट करण्याचा इशारा कंपनीने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
- ५० लाखांचा विमा बंद, कोरोना योद्ध्यांना मिळणार नवे कवच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

