Share

आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप

Published On: 

बुलडाणा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना आ.संजय गायकवाड यांनी अपशब्द वापरले होते. त्यानंतर बुलडाण्यात माजी आमदार विजयराज शिंदे यांना मारहाण, पुतळा जाळल्याचे प्रकरण आदी प्रश्नांवरुन शिवसेना अन् भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यानंतर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण जे बोललो त्यावर अजूनही ठाम असल्याची भूमिका मांडली. तसेच  जामोदचे (जि.जळगाव) भाजप आ.संजय कुटे यांना आव्हान दिले होते.

पण आ. संजय कुटे यांनी आपण या प्रकरणाला येथेच विराम देत असल्याचे सांगितले. अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीचा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे विधान कुटे यांनी केले. शिवाय आपण पैलवान नसल्याने कुस्ती करु शकत नाही. लोकांनी आपल्याला विकासासाठी निवडून दिलेले आहे, मारामारी करण्यासाठी नाही असे सांगत गायकवाड यांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान पत्रकार परिषद घेऊन मतदारसंघाकडे जात असतानाच आ.कुटेंच्या गाडीवर दगडफेक झाली आणि बुक्क्याही मारण्यात आल्या. यामुळे प्रकरण चांगलेच तापले होते. आ. संजय कुटे यांची गाडी जयस्तंभ चौकातून पुढे जात असताना चावडीजवळ त्यांच्या गाडीला बुक्का मारण्यात आला. त्यानंतर पुढे हनवतखेड रस्त्याने त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली.

जयस्तंभ चौकात झालेल्या राड्याप्रकरणी दोन्ही गटाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुतळा जाळल्याप्रकरणी, शिवीगाळ प्रकरणी, मारहाण प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गुन्हे दाखल करण्यावरुन पोलिस व भाजपात भविष्यात सामना रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!