जळगाव : चाळीसगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. खेरडे (सोनगाव) येथे टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आपले जीवन संपवावे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून तीन तरुण मुलीच्या घरासमोर येऊन इशारे करून त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे संताप व्यक्त होत आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या १६ वर्षीय मुलीला गावातील विशाल एकनाथ जाधव, विलास पुरनदास चव्हाण आणि पप्पू चरणदास चव्हाण हे १५ दिवसांपासून त्रास देत होते. तिघे संशयित मुलीच्या घरासमोर येऊन इशारे करत होते. या तिघांच्या त्रासाला कंटाळून मुलीने १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.
या घटनेत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी विशाल जाधव, विलास चव्हाण व पप्पू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संपत आहेर करत आहेत. तिघे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
- ५० लाखांचा विमा बंद, कोरोना योद्ध्यांना मिळणार नवे कवच
- ‘आम्हाला तुमच्या कामाचा वेग माहितीये’, सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
- संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

