नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने कोरोना योद्ध्यांचे सुमारे ५० लाख रुपयांचे विमा कवच रद्द केले आहे. त्याऐवजीएक नवी पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत (पीएमजीकेपी) कोरोना योद्ध्यांचे सर्वच दावे २४ एप्रिलपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर त्यांच्यासाठी एक नवी विमा पॉलिसी लागू केली जाईल,’ असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्राने गतवर्षी मार्च महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू केली होती. या अंतर्गत त्यांना सुमारे ५० लाख रुपयांचे विमा कवच पुरवले जात होते. कोरोनाचा सामना करताना कोविड योद्ध्यांच मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणासाठी ही रक्कम दिली जात होती. पण आता केंद्राने ही महत्त्वपूर्ण योजना गुंडाळून त्याजागी एक नवी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘कोरोना वॉरियर्सना सरकार एक नवी विमा पॉलिसी उपलब्ध करवून देणार आहे. यासाठी मंत्रालयाची ‘न्यू इंडिया ॲश्युरन्स’ कंपनीशी बोलणी सुरू आहे,’ असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी एका ट्विटद्वारे स्पष्ट केले. ‘विमा कंपनीने आतापर्यंत २८७ दाव्यांचा निपटारा केला आहे.
या योजनेमुळे कोरोनाचा आघाडीवर सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यास मोठी मानसशास्त्रीय मदत केली. या योजनेचे सर्व दावे २४ एप्रिलपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर त्यांच्यासाठी एक नवी विमा पॉलिसी अमलात आणली जाईल,’ असेही मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आम्हाला तुमच्या कामाचा वेग माहितीये’, सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
- संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’


