Share

‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’

Published On: 

धुळे : आपल्या आमदार निधीतील एक कोटीचा निधी घेऊन त्यातून शिंदखेडा मतदारसंघातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिविरची सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती आमदार जयकुमार रावल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना ई-मेल पाठवला आहे.

मेलमध्ये म्हटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीतून एक कोटी रुपये कोरोना उपाययोजनासाठी खर्च करण्याची परवानगी आमदारांना दिली आहे. त्यानुसार आपला एक कोटीचा आमदार निधी घेऊन शिंदखेडा मतदारसंघात ऑक्सिजनयुक्त बेड आणि रेमडेसिविरची व्यवस्था करून द्यावी अशी विनंती आमदार जयकुमार रावल यांनी केली आहे.

फेब्रुवारीपासून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बेड करण्याची मागणी मी शासनाकडे केली आहे, जेव्हा धुळे जिल्ह्यात अत्यंत कमी रुग्ण होते; परंतु निधीची अडचण होती की काय माहिती नाही पण अद्यापही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बेडची सोय झाली नाही. राज्य शासनाने आता आमदार निधीतून १ कोटी खर्च करायला परवानगी दिली आहे त्यामुळे माझा पूर्ण १ कोटी निधी ऑक्सिजन आणि रेमडेसिविरसाठी खर्च करा पण रुग्णांना या सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, अशी विनंती माजी मंत्री रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!