धुळे : राज्यात ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२१ या नऊ महिन्यांत १०२ पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच दीड हजारापेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. दुसरीकडे सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेने केला आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ५० पत्रकारांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. फेब्रुवारीनंतर दुसऱ्या लाटेत बाधित पत्रकारांची संख्या तर वाढलीच. परंतु मृत्यूचेही प्रमाणही वाढले. फेब्रुवारी ते एप्रिल या दोन महिन्यात तब्बल ५६ पत्रकारांचा मृत्यू झाला. तसेच दोन पत्रकारांनी आत्महत्या केली तर एकाची हत्या झाली. पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांमध्ये ५५ ते ६० वर्षे वयोगटातील पत्रकार होते.
दुसऱ्या लाटेत तरुण पत्रकारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पत्रकारांचे लसीकरण करावे, या मागणीसाठी पत्रकार परिषदेतर्फे ई-मेल पाठवा आंदोलन झाले. पण राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. कोरोना काळात अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. औषध उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यातून दोन पत्रकारांनी आत्महत्या केली. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पत्रकारांना ५० लाखांची मदत देण्याची घोषणा झाली. पण ती देखील मदत मिळाली नसल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
- ५० लाखांचा विमा बंद, कोरोना योद्ध्यांना मिळणार नवे कवच
- ‘आम्हाला तुमच्या कामाचा वेग माहितीये’, सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

