Share

Women’s World Cup : भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत, विश्वचषकासाठी फोडली विजयी डरकाळी

Published On: 

नवी दिल्ली : आयसीसी महीला विश्वचषक २०२२ मधील चौथा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर तब्बल १०७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत विश्वचषकात विजयी डरकाळी फोडली आहे. भारताने नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २४४ धावा केल्या होत्या.

तर पाकिस्तान पुढे २४५ धावांचे लक्ष ठेवले होते. संघाची सुरुवात खूप हळू झाली. त्यामुळे पाकिस्तान संघाला या लक्षाचा यशस्वीपणे पाठलाग करता आला नाही. त्यांचा संघ १३७ धावांवर ऑलआउट झाला. पाकिस्तानकडून  एस आमिनने सर्वाधिक ३० धावा केल्या.

तर भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. झुलन गोस्वामी आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २, व मेघना सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.

भारताकडून सलामीवर स्मृती मानधनाने ५२, दीप्ती शर्मा ४०, पूजा वस्त्रकर ६७, व स्नेह राणाने नाबाद ५३ धावांची खेळी केली. या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या पूजा वस्त्रकरला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!