Share

Russia-Ukraine War: रशियाच्या जोरदार आक्रमणाने युक्रेन चिंतेत ; आता ‘हा’ अणुऊर्जा प्रकल्प धोक्यात 

Published On: 

नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे.

युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्कराच्या तुलनेत काहीच ताकदवान नाहीये. त्यामुळे या युद्धात युक्रेनचे जास्त नुकसान होत आहे. २४ फेब्रुवारी पासून रशियाने कोणतीही दयामाया न दाखवता युक्रेनवर सतत हल्ले केले आहेत. रशियाच्या या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागत आहे. जीव वाचवायच्या  आकांताने  अनेक युक्रेनी नागरिक देशातून पलायन करायला लागले आहेत. रशियन लष्कर कोणतीही दयामाया दाखवायला तयार नाही.

बलाढ्य रशियन लष्कराने आत्तापर्यंत युक्रेनमधील दोन अणूऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतले आहेत. आता रशियन लष्कर युक्रेनमधील तिसरा अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी कूच करत आहे. युझनौक्रेन्स्कमधील अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेण्यास रशियन लष्कर कूच करत आहे. झापोरिझ्झिया हा युरोप खंडातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प नुकताच रशियन लष्कराने ताब्यात घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!