नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे.
युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्कराच्या तुलनेत काहीच ताकदवान नाहीये. त्यामुळे या युद्धात युक्रेनचे जास्त नुकसान होत आहे. २४ फेब्रुवारी पासून रशियाने कोणतीही दयामाया न दाखवता युक्रेनवर सतत हल्ले केले आहेत. रशियाच्या या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागत आहे. जीव वाचवायच्या आकांताने अनेक युक्रेनी नागरिक देशातून पलायन करायला लागले आहेत. रशियन लष्कर कोणतीही दयामाया दाखवायला तयार नाही.
रशियन लष्कराने केलेल्या हल्यात अनेक युक्रेनी सामान्य नागरिकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना जगातील अनेक नेत्यांनी हल्ला थांबविण्याची विनंती केली आहे. मात्र व्लादिमीर पुतीन कोणाचेही ऐकायला तयार नाही. त्यातच काही कालावधीपूर्वी इस्त्रायलचे प्रधानमंत्री नफ्ताली बेनेट यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आहे. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतल्यावर नफ्ताली बेनेट यांनी दूरध्वनीवरून युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी सुद्धा युद्ध कश्या प्रकारे थांबवता येईल याबद्दल चर्चा केली. रशियामधून नफ्ताली बेनेट थेट जर्मनीमध्ये जाऊन रशिया युक्रेन युद्धाबाबतीत त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Disha Salian Case : नऊ तासांच्या चौकशीनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी अमित शहांना फोन केला आणि…”
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला मुख्यंमत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार ; काय आहे कारण
- Russia-Ukrain War : युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची व्यथा ; म्हणाले…
- साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची शरद पवारांवर स्तुतीसुमने ; म्हणाले
- टॉलिवूड अभिनेत्री ‘आरती अग्रवालच’ वयाच्या ३१ व्या झाले वर्षी निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

