Share

“मोठ्या व्यक्तींकडून न शोभणारी वक्तव्य…”, अजित पवारांचा राज्यपालांना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (६ मार्च) पुणे दौऱ्यावर आले असून यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मोदींनी पुणे मेट्रोला ग्रीन सिग्नल दाखवले. तद्पश्चात एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभेत मोदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपासून मोठ्या व्यक्तींकडून न शोभणारी वक्तव्य होत असल्याचे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) खोचक टोला लगावला.

यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की, ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोंदीना एक लक्षात आणून द्यायचे आहे. मागील काही दिवसांपासून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या साहाय्याने समाजकार्य केले. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे.’ तसेच मागील काही दिवसांपासून मोठ्या व्यक्तींकडून न शोभणारी वक्तव्य होत असल्याचेही पवार म्हणाले.

दरम्यान, चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते.’ तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!