Share

Women’s WC 2022: टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न पराभवाने भंगले, आफ्रिकेचा ३ विकेट्सने विजय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील लीग टप्प्यातील शेवटचा सामना २७ मार्च रोजी खेळला गेला. कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय संघाच्या पदार्पणातच योग्य ठरला. आजच्या सामन्यात सलामीच्या जोडीने जबरदस्त कामगिरी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मधल्या फळीतील फलंदाजांमुळे भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर विजयासाठी २७४/७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याला प्रत्युत्तर म्हणून आफ्रिकन संघाने हा सामना ३ विकेट्सने जिंकला आहे.

फलंदाजी करताना भारताने चांगली सुरुवात केली. सलामीवीर स्मृती (Smriti mandhana) आणि शेफालीने (shefali verma)अर्धशतकीय खेळी केली. तसेच कर्णधार मिताली आणि हरमनप्रीतनेही शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. सगळे काही सुरळीत दिसत असताना भारतीय गोलंदाजीने मात्र मार खाल्ला. दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीत कमल दाखवत सामना जिंकला. जिथे त्यांची सलामीवीर वोल्वर्डने ८० धावांची विजयी खेळी केली.

सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. दीप्ती शर्माच्या हातात चेंडू होता आणि उपांत्य फेरी गाठण्याची ही लढाई शेवटपर्यंत चालली. पण, अखेरीस आफ्रिकेने हा सामना ३ विकेटने जिंकला. त्यामुळे टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. साखळी टप्प्यातील सामना पूर्ण होताच भारताचा या विश्वचषक २०२२ चा प्रवासही संपला आहे. विजयाच्या इतक्या जवळ येऊन भारतीय महिला संघाचे स्वप्न पुन्हा तुटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!