Share

IPL 2022: ‘पिवळी जर्सी घालून थेट स्टेडियममध्ये जावं असं वाटतं होत’, सुरेश रैनाचे वक्तव्य व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैना आयपीएल २०२२ चा भाग नाहीये. १५ व्या हंगामात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. त्यामुळे रैना आयपीएलमध्ये सध्या एका नव्या रूपात म्हणजे कॉमेंट्री करताना दिसत आहे . पहिला सामना CSK विरुद्ध KKR यांच्यात झाला. सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणारा सुरेश रैनाने या सामन्याबाबत टिप्पणी करताना मनातली एक भावनिक इच्छा जाहीर केली.

IPL 2022 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात खेळला गेला. जडेजाच्या नेतृत्वाखालील संघाला स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली होती. सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. रैनाने स्टार संवादादरम्यान सांगितले की, “मी जेव्हा कार्यक्रमासाठी स्टेडियमच्या दिशेने येत होतो तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांची संख्या चांगली होती. माझे हॉटेलही स्टेडियमजवळ होते आणि मला पिवळी जर्सी घालून हळूच स्टेडियममध्ये प्रवेश करावा असे वाटले.”

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये मध्ये न विकल्या गेलेल्या सुरेश रैनाने नवीन इनिंगला सुरुवात केली. आयपीएलच्या १५व्या हंगामात रैनाने एक्सपर्ट पॅनेलमध्ये कमेंटेटर म्हणून सुरुवात केली. सामन्यापूर्वी तो अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये दिसला. या पॅनलमध्ये सामील झाल्यानंतर, हरभजन सिंग आणि आकाश चोप्रा यांनी सुरेश रैनाचे शोमध्ये स्वागत केले आणि पदार्पण कॅप देखील दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!