Share

“संजय राऊतांकडून माझी चेष्टा केली जाते पण हीच चेष्टा त्यांच्या…”, चंद्रकांत पाटलांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना नेते तथा मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या चौकशीत ईडी अधिकाऱ्यांना एक डायरी सापडली असून त्यात संशयास्पद व्यवहार समोर आले आहेत. या डायरीत ‘मातोश्री’ला ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि दोन कोटी रुपयांचे आणखी एक गिफ्ट देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.यावर यशवंत जाधव यांनी ते चुकीचे ठरवत डायरीत आईसाठी लिहिल्याचे म्हटले आहे. यावरच भाजपकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही प्रतिक्रिया देत थेट शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“अशी डायरी सापडली की नाही याबद्दल मला अद्याप काही माहिती नाही. पण मला एवढंच दिसत आहे की, खूप काही तरी होणार आहे. वारंवार संजय राऊत यांच्याकडून माझी चेष्टा केली जाते. पण सगळी चेष्टा त्यांच्या अंगावर येणार आहे. कारण मी जे म्हणत आहे ते सगळं खरे ठरत चाललं आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान या संदर्भात यशवंत जाधव यांनी पहिल्या नोंदीमध्ये ५० लाखांच्या घड्याळांचे त्यांनी आईच्या वाढदिवसानिमित्त वाटप केले होते. तसेच आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी गुढीपाडव्याला गरजूंना दोन कोटी रुपयांच्या वस्तू वाटप केल्याचे म्हटले आहे. या भेटवस्तू वाटपासाठी आपण मातोश्री लिहिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यावरूनच भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर धरले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!