🕒 1 min read
मुंबई: महिला विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सहावा सामना खेळत आहे. हॅमिल्टन येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २२९ धावा केल्या आहेत. दरम्यान, बांगलादेशची गोलंदाज जहांआरा आलमने शेवटच्या षटकात विकेट घेत अनोखे सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CbZHiLCoOoo/
भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सामन्याचे गांभीर्य ओळखून भारतीय फलंदाजांनी या सामन्यात हुशारीने फलंदाजी केली. टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून २२९ धावा केल्या. यादरम्यान बांगलादेशची वेगवान गोलंदाज जहांआरा आलमच्या (jahanara alam) षटकांमध्ये भारतीय फलंदाजांनी भरपूर धावा केल्या, मात्र शेवटच्या षटकात स्नेह राणाला (sneh rana) बाद केले.
शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्नेह राणाला फाइन लेगच्या दिशेने स्कूप शॉट खेळून धाव घ्यायची होती. पण तिच्या बॅटशी चेंडूचा संबंध बसला नाही आणि बांगलादेशची क्षेत्ररक्षक रितू मोनीने अप्रतिम झेल घेतला. या विकेटचे सेलिब्रेशन करताना जहांआराने स्नेहला आधी फ्लाइंग किस दिला आणि नंतर तोंडावर बोट ठेवण्याची कृती केली. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- VIDEO : अय्यो..! महिलांच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये घेतलेला ‘हा’ अद्भुत झेल तुम्ही पाहिला का?
- “कसलीही सुरक्षा न घेता महाराष्ट्रात फिरून दाखवा”, गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना थेट आव्हान
- “आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करून…”, गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना जोरदार टोला
- Women’s WC 2022: ३० धावांवर बाद होऊनही स्मृतीने या खास क्लबमध्ये केली एंट्री, धावांच्या बाबतीत रचला रेकॉर्ड!
- विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ आता साता समुद्रापार पोचणार..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
