Share

“आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करून…”, गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना जोरदार टोला

Published On: 

मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना देशपातळीवर लाँच करून संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यांचा पार फज्जा उडविला, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच संजय राऊतांच्या माहिती करिता सांगतो जेव्हा लाल चौकात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ‘कोई माँ का लाल तिरंगा लहराके दिखाये’ अशा धमक्यांचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता, असेही पडळकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,’तुम्हाला उत्तरप्रेदश आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले. तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य ठाकरे यांच्याबाबत दिसत आहे.

दरम्यान, पुढे सुरक्षेसंदर्भात बोलत असतांना पडळकर म्हणाले की, ‘राऊत तुम्ही वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत लेख लिहिता. पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात बिनधास्त फिरवून दाखवा.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!