Share

VIDEO : अय्यो..! महिलांच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये घेतलेला ‘हा’ अद्भुत झेल तुम्ही पाहिला का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाने मंगळवारी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाने वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा ५ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाचा स्पर्धेतील हा सहावा विजय ठरला. विशेष म्हणजे एकही सामना न गमावता त्यांना लीग टप्प्यातील उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले. या सामन्यात एश्ले गार्डनरने एका हाताने असा झेल घेतला, की हा झेल पाहून तुम्हीली थक्क व्हाल.

वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शानदार फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २७१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाने ४५.२ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार मेग लॅनिंगने १३५ धावा ठोकल्या आणि ती नाबाद परतली. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर लॉरा वॉल्व्हर्टने सर्वाधिक ९० धावांचे योगदान दिले. दरम्यान, मिग्नॉन डू प्रीझचा गार्डनरने एका हाताने आश्चर्यकारक झेल टिपला. तिच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ४६वे षटक सुरू होते. ऑस्ट्रेलियाकडून जेस जॉन्सन गोलंदाजी करत होती. मिग्नॉन डू प्रीझने तिच्या चेंडूवर डीप-मिड विकेटवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेबाहेर जाण्याऐवजी हवेत झेपावला. त्यावेळी गार्डनर सीमा रेषेजवळ उपस्थित होती. काही पावले मागे धावत तिने हवेत उडी घेत अशक्य झेल एका हाताने पकडला.

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!