🕒 1 min read
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना हिने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खास विक्रमाची नोंद केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात आयसीसी वनडे विश्वचषकाचा २२ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा संघ भारतीय महिला संघासमोर आला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच स्मृती मंधाना हिने आपल्या नावावर एक विक्रम नोंदवले आहे.
स्मृतीने (smriti mandhana) तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिने हा विशेष विक्रम केला आहे. मंधानासाठी ही स्पर्धा आत्तापर्यंत खूपच छान राहिली आहे. या विश्वचषकात तिने भारताकडून खेळताना २५० हून अधिक धावा केल्या आहेत. तिने सामन्यात बांगलादेशविरुद्ध १७ धावा काढताच हा विशेष विक्रम केला.
Mount 5⃣0⃣0⃣0⃣ in international cricket for SM1⃣8⃣ ????#CWC22 @mandhana_smriti pic.twitter.com/LDgamsYwMK
— Women’s CricZone (@WomensCricZone) March 22, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीतही तिने विशेष एंट्री केली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना तिने एकूण ३० धावा केल्या. त्यादरम्यान त्याने ५१ चेंडूंचा सामना केला. तिच्या ३० धावांच्या खेळीत मंधानाने ३ चौकार मारले. या विशेष रेकॉर्डसाठी स्मृतीचे सगळीकडून कौतुक होत आहे. तिच्या धावा जरी असला तरी तिने केलेली कामगिरी अप्रतिम ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ आता साता समुद्रापार पोचणार..
- रशिया-युक्रेन युद्धामुळे नाशिकच्या द्राक्ष शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!
- भाजप खासदाराने गडकरींना दिली ‘स्पायडरमॅन’ ची उपाधी; नेमके कारण काय?
- IPL 2022: महाराष्ट्राच्या क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर! आता २५% पेक्षा जास्त प्रेक्षक मैदानावर उपस्थित असणार…
- “काँग्रेस-राष्ट्रवादी उपटले तसाच एमआयएम…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
