Share

सौदी अरेबिया मधील महिलांना मिळाल स्वातंत्र्य

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  भारतीय महिला आता प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत. केवळ चूल आणि मुल या परंपरेशी बांधून न राहता महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. तसेच संविधानाने देखील भारतीय महिलांना पुरेपूर स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे भारतीय महिला केवळ देशातचं नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करत आहेत.

आपल्या देशात ज्या प्रकारे महिलांना स्वातंत्र्य आहे. तसे स्वातंत्र्य इतर देशातील महिलांना मिळत नाही. खासकरून अरब देशांमध्ये महिलांना अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीचा जाच सहन करावा लागत आहे. ज्या साध्या गोष्टी महिला करतात त्या गोष्टी सौदी अरेबियातील महिलांना करता येत नाहीत. तेथील महिलांचे आयुष्य खूप कठीण आहे. आपण विचार करु शकत नाही एवढी बंधने त्यांच्यावर लादलेली आहेत. पण सध्या त्यांची काही बंधने रद्द केल्यामुळे तेथील महिला आनंदी आहेत.

१८ वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवास करण्यासाठी परवानगीची गरज नसते मात्र सऊदी अरब मधील महिलांना प्रवास करताना घरातील पुरुषाची परवानगी घ्यावी लागते पण आता तेथील क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान ने हा नियम रद्द केला आहे. आता महिलांना प्रवास करताना परवानगी घ्यावी लागणार नाही . तसेच त्या महिला पासपोर्ट साठी देखील स्वतः अर्ज करु शकतात. तसेच काही दिवसापूर्वी तेथील महिलांना गाडी चालवण्याची देखील परवानगी दिली आहे.

या गोष्टी जरी आपल्यासाठी खूप नॉर्मल असतील पण सौदी अरेबिया मधील महिलांची परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे. अजून अशा काही नॉर्मल गोष्टी त्या महिला करू शकत नाहीत.

काय आहेत त्या गोष्टी?

१. कपडे खरेदी करताना ते ट्राय करुन पाहू शकत नाही
सौदी अरेबिया मधील पुरुषांना हे सहन करायला जमत नाही की ट्रायल रूम मध्ये एका महिलेने कपडे काढून ठेवले आहेत त्यामुळे तेथील महिलांना कपडे खरेदी करताना ते ट्राय करून दिले जात नाही.

२. पुरुषांना भेटणे त्यांच्या सोबत बोलणे गुन्हा आहे
महिला व पुरुष रस्त्यावर उभे राहून बोलू शकत नाही. हा त्यांच्या कडे गुन्हा समजला जातो आणि जर कोणत्या महिलेने असे केले तर तिला शिक्षा दिली जाते. सौदी अरेबिया मध्ये बर्याच ठिकाणी महिला व पुरुषांना वेगवेगळ्या एंट्री पॉइंट्स आहेत.

३. बुरखा घालून फिरणे गरजेचे आहे
तेथील महिलांना आपल्या कपड्यान वर बुरखा घालावा लागतो न घालता त्या घराबाहेर येऊ शकत नाही हा त्याचं ड्रेस कोड आहे .त्यांना आपले डोके नेहमी झाकून ठेवावे लागते.

४. खेळा मध्ये सहभाग घेऊन दिला जात नाही
२०१७ मध्ये पहिल्यांदा सौदी अरेबिया मधील महिलांना स्टेडीयम मध्ये बसण्यासाठी परवानगी दिली होती अजून देखील तेथील महिला खेळात सहभाग घेऊ शकत नाही.

महत्वाच्या बातम्या 

रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

शपथ घेणारे तरी पक्षात राहतील का, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला 

परळीत महिला भवन उभारणार; महिला बचत गटांना नाथ प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करणार – धनंजय मुंडे

आघाडीला सुरुंग : 20 आमदार माझ्या संपर्कात – महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!