टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पुण्यातील एका कार्यक्रमात घोषणा केली आहे. चित्रा वाघ यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जात आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर सध्या राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कार्य पाहून त्यांना बढती देण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

