टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “काही पक्षांची अवस्था अशी झाली आहे की त्या पक्षात कुणी राहायला तयार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना शपथ दिली जात आहे, पण ते तरी राहतील का हा प्रश्न आहे”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. त्याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना पक्ष आणि शरद पवारांना न सोडण्याच्या दिलेल्या शपथेवरुन टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना पक्षाक्षी एकनिष्ठ राहण्याची आणि पवारांची साथ न सोडण्याची शपथ दिली आहे. भाजपमध्ये येण्यासाठी अनेक लोक इच्छूक आहेत. परंतू आमच्याकडे मर्यादित संख्या असल्याने आम्ही काही थोडीच लोकं पक्षात घेणार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
बिग बॉसमध्ये आरोह वेलणकरने सांगितले दिव्यांगांसाठी काम करतानाचे अनुभव
भाजपने केला खासदारांना व्हीप जारी, ‘या’ महत्वपूर्ण विधेयकावर मतदान होण्याची शक्यता
पंकजा मुंडेंनी चालवला लोकनेत्याचा खरा वारसा, शेतमजुराच्या पोराच्या शिक्षणाला केली मदत
मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही, राज ठाकरे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

