Share

आघाडीला सुरुंग : 20 आमदार माझ्या संपर्कात – महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशह चं राजकारण सुरु झालं आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोटही महादेव जानकर यांनी खळबळजनक व्यक्तव्य केले आहे. पंढरपूर येथे राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या वतीने धनगर समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक आमदारांनी भाजपचा रस्ता धरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असताना सत्ताधाऱ्यानी राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेतल्याने राष्ट्रवादी पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

भारताची अर्थव्यवस्था गडगडली, जागतिक क्रमवारीत मोठी घसरण

कोण असणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?; आज होणार फैसला

कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेतील; हसन मुश्रीफ यांना विश्वास

पुष्पक विमान’च्या फिल्ममेकरसोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!