🕒 1 min read
मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. आणि आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून दोन्ही दिवस विरोधी पक्षातील नेत्यांच्या गदारोळामुळे चांगलाच गाजला. मात्र त्यात एक महत्वपूर्ण घटना म्हणजे महिलांसाठी अधिवेशनात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’कायदा गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ‘शक्ती’कायद्याचे (Shakti Act) विधेयक गुरुवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत मांडले.
तसेच कायदा परिपूर्ण असल्याचा सरकारचा दावा नाही. पण त्यात काळाबरोबर सुधारणा होत राहतील असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच आंध्र प्रदेशाच्या दिशा कायद्यालाच अजून राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली नाही, मात्र महाराष्ट्राच्या शक्ती कायद्याला राष्ट्रपतींनी वेळेत मंजुरी द्यावी यासाठी केंद्रातील भाजप सरकारकडे पाठपुरावा करून सहकार्य करण्याचे आवाहन वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केले. दरम्यान विधान परिषदेत जरी हा कायदा मंजूर झाला असला तरी, राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी तो केंद्राकडे पाठवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या!’
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- ‘कडी लावून घरी बसणे हाच सर्व समस्यांवर एकमेव उपाय’, नवीन निर्बंधावरून भाजपची टीका
- “पेपरफुटीची सीबीआय चौकशी नको म्हणतयं, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे”
- “मुख्यमंत्र्यांच्या अजारपणाबाबत इतकी गुप्तता का?”, नितेश राणेंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
