मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. यातच आता महाराष्ट्रातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली असून कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज(२४ डिसें.)नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी काल(२३ डिसें.)टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत नाताळ तसेच नववर्ष स्वागताच्या वेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयी चर्चा करण्यात आली. दरम्यान, या अनुषंगाने आज राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, या बैठकीमध्ये मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित आदींनी सहभाग नोंदवत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासंदर्भात सूचना केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

