मुंबई : राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्यांनी विविध मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. दोन दिवस विविध मुद्द्यावरुन गाजले आजचा तिसरा दिवसही गाजणार असल्याचे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. काल भाजप नेत्यांनी विधिमंडळाबाहेर दोलन करुन घोषणाबाजीही केली.
भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कमी वेळेत उरकणं हे लोकशाहीला धरुन नाही. लोकशाहीची पायमल्ली करण्याचंच त्यांनी ठरवलं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय होतो ते पाहून आम्ही पुढील दिशा ठरवू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. सगळी क्रोनॉलॉजी, घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. सीबीआय चौकशी नको म्हणताय तर कुठली तरी चौकशी लावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाल्याने ते अधिवेशनला उपस्थित राहू शकले नाहीत, यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्या कुणाकडे का देत नाहीत? असा सवालही उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खरच आजारी असते तर अधिकृत डॉक्टरांचे ऑफिशयल हेल्थ बुलेटीन बाहेर निघाले असते, मुख्यमंत्र्यांच्या आजाराबद्दल इतकी गुप्तता का पाळली जाते? गुप्तता ठेवल्यामुळे हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या!’
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य


