मुंबई: दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron)हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. यातच आता महाराष्ट्रातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली असून याच पार्श्वभूमीवर आज(२४ डिसें.)नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. आताच कुठेतरी सर्व व्यवहार सुरु असतानाच नवीन निर्बंधावरून भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
‘भीती एवढीच आहे, की कडी लावून घरी बसणे हाच सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे असे यांना वाटते.’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केली आहे.
भीती एवढीच आहे, की कडी लावून घरी बसणे हाच सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे असे यांना वाटते. pic.twitter.com/ncuPVjqNdg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 24, 2021
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी काल(२३ डिसें.)टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत नाताळ तसेच नववर्ष स्वागताच्या वेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवरच आज राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या!’
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य


