🕒 1 min read
मुंबई: मागील ७०वर्षांत देशाने जे कमावले ते सगळे ‘मोडीत’च काढायचे, असे ‘मोदी’ सरकारने ठरविलेले दिसत आहे. आता खासदार वरुण गांधी यांनीही त्याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे. खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकले जात आहे, अशा शब्दांत वरुण गांधी मोदी सरकारवर बरसले आहेत. राहुल गांधी किंवा इतरांकडे तुम्ही दुर्लक्ष करता हे ठीक, पण वरुण गांधी हे तुमच्याच पक्षाचे आहेत. त्यांनीही तेच प्रश्न उपस्थित केले आहेत. तेव्हा आता तरी मौन सोडा. कारण तुम्ही कितीही झाकायचा प्रयत्न केलात तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या! असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून लगावला आहे.
केंद्र सरकारने विविध सरकारी उपक्रम आणि बँकांच्या खासगीकरणाचा धडाकाच लावला आहे. त्यावरून विरोधकांसह सर्वच पातळ्यांवर टीका होत असली तरी केंद्रातील सत्ताधारी त्यावर सोयिस्कर मौन बाळगून आहेत. बोलायचेही नाही आणि जे करायचे आहे ते सोडायचेदेखील नाही. असेच एकंदरीत केंद्र सरकारचे खासगीकरणाबाबतचे धोरण आहे. मात्र आता भाजपचेच एक खासदार वरुण गांधी (BJP MP Varun Gandhi) यांनीही त्यावरूनच स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. सरकारचे खासगीकरणाचे आणि ई-कॉमर्सचे धोरण देशविरोधी असून खासगीकरणामुळे कोटय़वधी लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत, असे वरुण गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्राच्या धोरणावर सडकून टीका केली.
‘केंद्र सरकार खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकून टाकत आहे. त्यामुळे कोटय़वधींच्या रोजगारावर तर गदा आलीच आहे, परंतु अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली आहे,’ असे वरुण गांधी म्हणाले. सरकारी नोकऱ्या देण्याऐवजी आहेत त्या काढून घेण्याचे उफराटे धोरण सध्या राबविले जात आहे, असेही ते म्हणाले. वरुण गांधी हे नेहरू गांधी परिवारातील असले तरी ते भाजपचे खासदार आहेत. त्यांच्या आई मनेका गांधी यादेखील बरीच वर्षे भाजपच्याच खासदार राहिल्या आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. त्यामुळे वरुण गांधी यांची टीका त्यांच्या पक्षधुरिणांना झोंबणारी नक्कीच आहे.
राहुल गांधी यांची टीका ‘राजकीय’ वगैरे असल्याची बतावणी भाजपवाले नेहमीच करीत असतात. मग आता त्यांच्याच पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केलेल्या टीकेबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे? अर्थात, त्यावरही वरुण गांधी सध्या ‘नाराज’ वगैरे आहेत. त्या वैफल्यातून ते स्वपक्ष आणि सरकारवर टीका करीत आहेत, अशी मखलाशी भाजपची मंडळी करतील. मागील काही दिवसांतील बातम्यांवरून चित्र जरी तसे दिसत असले तरी वरुण गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे, मुद्द्यांचे काय? असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. पक्षाचे धोरण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे काही ठरले असेल तर तो भाजपचा पक्षांतर्गत मामला आहे. त्यावर कोणी काही टिकाटिप्पणी करण्याचे कारण नाही. वरुण गांधी काय किंवा इतर काय, त्यांनी वस्तुस्थितीला धरून केलेल्या टीकेवर तरी काही टिप्पणी कराल की नाही? केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकार म्हणून तुम्ही जनतेला द्यायलाच हवीत. कारण सामान्य जनतेच्याही मनात सरकारी कंपन्यांच्या या ‘बंपर सेल’बाबत हेच प्रश्न आहेत. असे संजय राउत यांनी म्हटले आहे.
विरोधक काय किंवा सुब्रमण्यम स्वामी, वरुण गांधी यांच्यासारखे भाजपचे ‘स्वपक्षीय निंदक’ काय, हे जनतेच्या मनातील खदखदच
पक्षद्रोही म्हणत करायचे. सोयिस्कर बाळगायचे धोरण केंद्रातील सरकारचे आहे. निर्गुतवणुकीतून १.७५ कोटी सरकारी तिजोरीत भरायचे म्हणे केंद्र सरकारचे ‘लक्ष्य’ आहे. भरण्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी सामान्य जनतेच्या खिशांना का कात्री लावीत आहात? त्यांच्या रोजगारावर का गदा आणीत आहात? असा प्रश्न करत राहुल गांधी किंवा इतरांकडे तुम्ही दुर्लक्ष करता ठीक, पण वरुण गांधी हे तुमच्याच पक्षाचे आहेत. त्यांनीही तेच प्रश्न उपस्थित केले आहेत. तेव्हा आता तरी मौन सोडा. कारण तुम्ही कितीही झाकायचा प्रयत्न केलात तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ आस्वतोच हे तरी लक्षात घ्या! अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
