Share

“मुख्यमंत्र्यांच्या अजारपणाबाबत इतकी गुप्तता का?”, नितेश राणेंचा सवाल

Published On: 

मुंबई : राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या भाजपा नेत्यांनी विविध मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधत विधिमंडळात गदारोळ घातला. त्यानंतर विधिमंडळाबाहेर आंदोलन करुन घोषणाबाजीही केली. त्यानंतर भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या अजारपणाबाबत इतकी गुप्तता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी निलेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Udhav Thackrey) हे खरच आजारी असते तर अधिकृत डॉक्टरांचे ऑफिशयल हेल्थ बुलेटीन बाहेर निघते, मुख्यमंत्र्यांच्या आजाराबद्दल इतकी गुप्तता का पाळली जाते? गुप्तता ठेवल्यामुळे हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री पदाचा चार्ज कुणाकडे द्यायला पाहिजे, या प्रश्नाला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना दुसऱ्या कोणावरच विश्वास नाही, हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे ते कुणाकडेच चार्ज देत नाहीत.

दरम्यान नितेश राणे यांनी घोषणाबाजी करताना आदित्य ठाकरे आल्याचे पाहून ‘म्याव म्याव’ असा आवाज काढला. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओसंदर्भात नितेश राणे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मी म्याव म्याव केलं कारण शिवसेनेची अवस्थाच म्याव म्यावसारखी झाली आहे. ही अवस्था कशामुळे झाली हे त्यांनी शोधलं पाहिजे. आधी वाघाची डरकाळी देणारी शिवसेना आणि आता म्याव म्याव करणारी शिवसेना आहे. अशी टीका नितेश राणेंनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!